पौगंडावस्था हा शारीरिक, भावनिक आणि मानसिक विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. किशोरावस्था म्हणजे मेंदूच्या जलद विकासाचा काळ. हा काळ उत्साह, बदल आणि आव्हानांनी भरलेला असतो.
किशोरवयीन मुलांसाठी मानसिक आरोग्य विशेषतः नाजूक असते. हार्मोन्समधील बदलामुळे होणारे भावनिक चढ-उतार, शैक्षणिक दबाव, सोशल मीडियाचा प्रभाव आणि नातेसंबंधांतील गुंतागुंत यामुळे या वयात ताण, चिंता, नैराश्य आणि इतर मानसिक समस्या उद्भवू शकतात.
जागतिक स्तरावर 10 ते 19 वयोगटातील सुमारे प्रत्येक 7 पैकी 1 किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी मानसिक आजारांनी प्रभावित होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, आत्महत्या ही तरुणांमध्ये मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. भारतातील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की सुमारे 15% किशोरवयीन मुले मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत.
किशोरवयीन मुलांमध्ये चिंता विकार हा सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे.
लक्षणे:
नैराश्य म्हणजे सतत निराशेची भावना.
लक्षणे:
एडीएचडी हा विकार प्रामुख्याने बालपणात सुरू होतो आणि पौगंडावस्थेतून प्रौढत्वापर्यंत चालू राहू शकतो.
लक्षणे:
परिणाम: एडीएचडीमुळे किशोरवयीन मुलांच्या शालेय जीवनावर, नातेसंबंधांवर आणि आत्मसन्मानावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
पौगंडावस्थेत शरीराच्या प्रतिमेबद्दलची चिंता ही मोठी समस्या ठरते. "मी स्वत:च्या किंवा समाजाच्या नजरेत कसा दिसतो?" हा प्रश्न मुलांना महत्त्वाचा वाटू लागतो. वजन, उंची, केसांची शैली, कपडे याबद्दल चिंता वाढते. यामुळे आत्मकेंद्रीपणा वाढतो आणि कधी कधी नैराश्य व खाण्याचे विकार निर्माण होऊ शकतात.
प्रकार:
परिणाम: उपचार न केल्यास गंभीर शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.
मानसिक आघात किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम करू शकतो. अपघात, छळ, गैरवर्तन अशा आघातजन्य घटना अनुभवल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर PTSD होऊ शकतो.
लक्षणे:
काही किशोरवयीन मुले मानसिक समस्या, समवयस्कांचा दबाव किंवा कठीण भावनांशी सामना करण्यासाठी धूम्रपान, ड्रग्ज (गांजा, एम.डी.) आणि अल्कोहोलचा वापर करू लागतात. या पदार्थांचा गैरवापर केल्याने त्याचे व्यसन लागते आणि त्याचा नकारात्मक परिणाम शारीरिक आरोग्य, नातेसंबंध आणि शैक्षणिक कामगिरीवर होतो.
मुलींमध्ये मासिक पाळी येण्याच्या १ ते २ आठवडे आधी काही मानसिक आणि शारीरिक लक्षणे दिसू शकतात, जसे की चिडचिडेपणा, उदासीनता, थकवा आणि शरीरात वेदना होणे.
किशोरवयात चढ-उतार होणे सामान्य आहे, पण चिंता, नैराश्य किंवा इतर मानसिक आजारांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. लवकर निदान, कौटुंबिक आधार आणि व्यावसायिक मदतीमुळे बहुतेक किशोर बरे होऊन निरोगी आणि परिपूर्ण जीवन जगू शकतात.